किशोरमध्ये कविता :- खरच किती सहजतेने आपण आपल्या मनातील भाव भावनेला कागदावर उमटवतो, त्यांना शब्दरूप देतो, आणि ती कविता लोकार्पण करतो, अर्थात ती कुठल्यातरी मासिकात, वर्तमानपत्रात छापून येते....आपल्याला दादही मिळते....पण जेव्हा आपल्या बालकवितेला किशोरमध्ये स्थान मिळतं तेव्हा बात कुछ औरच असते.....झालं असं की,किशोरच्या फेब्रुवारी २०१३च्या अंकात माझी 'नक्कल-बक्कल' ही कविता प्रकाशित झाली आणि मला खूप फोन आले...अजूनही येत आहेत. त्यात प्रामुख्याने कवी उत्तम कोळगावकर,कैलास दौंड,भोर मधील शिक्षक,मुरुड जंजिरा येथील शाळेतील मुख्याधापकही आहेत. या मुख्याधापकांनी तर मला विचारलं ,मी ही 'नक्कल-बक्कल' कविता मुलांना शिकवली तर चालेल का? मी म्हटलं,हो म्हणजे तुम्ही मुलांना ऑफ पिरियडला ही कविता मुलांना वाचून दाखवू शकतात.....तर ते म्हणाले की नाही ही कविता मला मुलांना शिकवायची आहे....या कवितेत चांगले नाट्य आहे..... आता त्यांच्या इतक्या चांगल्या अभिप्रायानंतर मी बापडी काय बोलणार ? माझ्या लहानपणापासून मी किशोर वाचत आहे....आणि त्याच किशोरमध्ये माझी कविता यावी... अशावेळी खूपच छान वाटतं......सर्वांचे मन:पूर्वक आभार!
आणि हो,धन्यवाद आव्हाड सर, किशोरमध्ये कविता पाठवायला सांगितल्याबद्दल !
'नक्कल-बक्कल'
खेळता खेळता बंडू धप्पकन पडला
लागलं नाही काही,पण मुद्दामच रडला
जोरात लागलं म्हणे,मला बॉगचे(Bag) बक्कल,
ताईने ओळखली त्याच्या रडण्याची नक्कल
'रडू नको बंड्या,मोठ्ठा होईल बाऊ
खाता नाही येणार तुला,बाबांनी आणलेला खाऊ'
तिने असं म्हणताच,बंडू एकदम चुप्प बसला
सुपरमनला(Superman) लागत नाही,असं म्हणत जोरात हसला....
ज्योती कपिले
किशोर फेब्रुवारी २०१३