kodi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
kodi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गंमतकोडी Gammatkodi

हे पुस्तक,ही कोडी तुम्हा सर्वांपर्यंत पोहचवण्याचा माझा एक प्रयत्न....
१) पंख आहे पण पक्षी नाही
    जादू करते पण जादुगार नाही
    प्रेमळ आहे पण आई नाही
   म्हटलं तर आहे ,म्हटलं तर नाही
   गोष्टीची पुस्तक वाचा तर खरी
   स्वप्नात येइल मग तुमच्या घरी
   ओळखा कोण?

२) भर उन्हाळ्यात, हिरव्यागार रानात
    पांढऱ्या मातीत ,लाल ढेकळ
    त्यावर पेरल्या काळ्या बिया
   खाल्लं तर मिळेल थंडावा
   अशी ह्या फळाची किमया
   ओळखा कोण?

३) कधी आनंदाचे,कधी दुःखाचे

    कधी अपेक्षित , कधी अनपेक्षित
    कधी गावातून ,कधी शहरातून
    कधी देशातून कधी परदेशातून
    गावोगाव चालू असत ह्याच मिरवण
    तिकीट घेवून ऐटीत,लाल गाडीतून फिरणं
    फोनमुळे आता फारसं विचारत नाही कुणी
    काळजाचा तुकडा हा फार आहे गुणी
    ओळखा कोण?

४) हिरवी हिरवाई ,हिरवागार रंग

    इटूकले ,पिटुकले ,नक्षीदार अंग
    औषधाचा गडू , पण चवीला कडू
    ओळखा कोण?

५) डोक्यावर तुरा असतो

    कृष्णाच्या मुकुटावर सजतो
    आकाशात काळे मेघ दाटले
    थुई थुई नाचण्यास पाऊल टाकले
    पावसाचे स्वागत करतो छान
   राष्ट्रीय पक्षी म्हणून घेतो मान
   ओळखा कोण?
६) आभाळात दाटी ,रंगबेरंगी पतंगाची

    प्रत्येकाला घाई तिळगुळ वाटण्याची
   आज होते सूर्याचे ,मकर राशीत संक्रमण
   'गोड बोला' असा मंत्र देणारा हा एक सण
   ओळखा कोण?