This my Riddle Book for Children. Published by Dimple Publication, Mumbai.But now i have created this Blog for everyone.so Read & Have Funमाझ्या गंमत कोडी ह्या डिंपल पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या पुस्तकात एकूण १३० गंमत कोडी आहेत. त्यातील ही काही कोडी,खास तुमच्यासाठी.तेव्हा वाचा,उत्तरं शोधा,आणि ही गंमत कोडी कशी वाटली याबद्दल लिहा...अरे हो,त्याच बरोबर माझ्या काही बालकविता,फरक ओळखा शिवाय तुमच्यासाठी मजेदार,गमतीदार खेळामध्ये पझल,पुस्तक कुठे मिळेल याचा पत्ताही!
Marathi Riddle Book
गंमतकोडी Gammatkodi
हे पुस्तक,ही कोडी तुम्हा सर्वांपर्यंत पोहचवण्याचा माझा एक प्रयत्न....
जादू करते पण जादुगार नाही
प्रेमळ आहे पण आई नाही
म्हटलं तर आहे ,म्हटलं तर नाही
गोष्टीची पुस्तक वाचा तर खरी
स्वप्नात येइल मग तुमच्या घरी
ओळखा कोण?
२) भर उन्हाळ्यात, हिरव्यागार रानात
पांढऱ्या मातीत ,लाल ढेकळ
त्यावर पेरल्या काळ्या बिया
खाल्लं तर मिळेल थंडावा
अशी ह्या फळाची किमया
ओळखा कोण?
३) कधी आनंदाचे,कधी दुःखाचे
कधी अपेक्षित , कधी अनपेक्षित
कधी गावातून ,कधी शहरातून
कधी देशातून कधी परदेशातून
गावोगाव चालू असत ह्याच मिरवण
तिकीट घेवून ऐटीत,लाल गाडीतून फिरणं
फोनमुळे आता फारसं विचारत नाही कुणी
काळजाचा तुकडा हा फार आहे गुणी
ओळखा कोण?
४) हिरवी हिरवाई ,हिरवागार रंग
इटूकले ,पिटुकले ,नक्षीदार अंग
औषधाचा गडू , पण चवीला कडू
ओळखा कोण?
५) डोक्यावर तुरा असतो
कृष्णाच्या मुकुटावर सजतो
आकाशात काळे मेघ दाटले
थुई थुई नाचण्यास पाऊल टाकले
पावसाचे स्वागत करतो छान
राष्ट्रीय पक्षी म्हणून घेतो मान
ओळखा कोण?
६) आभाळात दाटी ,रंगबेरंगी पतंगाची
प्रत्येकाला घाई तिळगुळ वाटण्याची
आज होते सूर्याचे ,मकर राशीत संक्रमण
'गोड बोला' असा मंत्र देणारा हा एक सण
ओळखा कोण?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)